Monday, August 18, 2008

डार्क मैटर

तुम्ही आणि मी ज्या अणू-रेणू पासून बनले आहोत ते ह्या विश्वाचा केवळ पाच टक्के भाग आहे असा जर तुम्हाला सांगितले तर ते खरा वाटेल? पण हे खरे आहे. मनुष्य आणि ही संपूर्ण जीवसृष्टी ह्या विश्वाचा अत्यंत छोटा भाग आहेत. ह्या विश्वाचा जवळपास वीस ते पंचवीस टक्के भाग अदृश्य घटकाने व्यापला आहे ज्याला आपण डार्क मॅटर म्हणतो आणि उर्वरित सत्तर टक्के अदृश्य उर्जा आहे जीला खगोलशतराज्ञ डार्क एनर्जी ह्या नावाने ओळखतात. आपले विश्व असे आहे ह्यावर आज खगोलशास्त्रज्ञांचे एकमत आहे. पण हे ९५ टक्के विश्व जे आपल्याला दिसत नाही ते कसले बनले आहे आणि काय आहे हा प्रश्ना साहजिकच आपल्या मनात येतो. डार्क एनर्जी हे आज खगोलशास्त्रातील एक आव्हान आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्याला आजवर डार्क एनर्जी बद्दल फार थोडे माहिती आहे. डार्क मॅटर ह्या विषयावर त्या मानाने आपण जरा भाग्यवान आहोत. ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे डार्क मॅटर हे गुरुत्वकर्शणाच्या माध्यमाने इतर घटकांशी माध्यमातून आपले अस्तित्व दाखवून देते. इतक्या मोठ्या प्रमणावर उपस्थित असल्याने ते इतर घटकांना आकर्षित करते. डार्क मॅटर ह्याबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रकाशाच्या काणांबरोबर किंवा प्रकाशाशी ह्याची प्रकशासोबत प्रतिक्रिया होत नाही. ह्यामुळे आपल्याला ते दिसताही नाही. परंतु विश्वाच्या मोठ्या प्रमाणावरील रचनेच्या अभ्यासातून हे निष्पन्न झाले आहे की हे उर्जा नसून काणांचे बनले आहे, म्हणजेच हे वस्तुमान ( मॅटर) आहे.
येथून पुढील काही लेखांमधे मी ह्या अदृश्य घटकावर प्रकाश टाकायचा प्रयत्न करेन.

3 comments:

HAREKRISHNAJI said...

कॄतिका तारकासंघ जसा द्विनेत्रीतुन विलोभनीय दिसतो तसेच आपले हे लेखण वाटते. पण हे असे अचानक उगवणाऱ्या धुमकेतु प्रमाणे का ? नेहमी नियमीत लिहीत जाना.

Suchita Kulkarni said...

धन्यवाद. अभ्यासाच्या व्यापामुळे वेळ जरा कमी मिळतो.. परंतु मी ह्यापुढे कायम लिहायचा प्रयातना करेन.

priyadarshan said...

Dec 01, Monday evening do not miss conjunction of Venus- Jupiter and Moon . Observe sky in North-West Direction from 6.15-30 pm to 9.30 pm.

It's the one of the wonderful event.