
तारे आयुष्यभर हायड्रोजनचे रूपांतर हिलियम मध्ये करून ऊर्जा निर्माण करतात. पण हायड्रोजनचा साठा मर्यादित असल्यामुळे तो संपू लागला की ऊर्जानिर्मिती घटू लागते. आता ताऱ्याच्या बाहेरिल आवरणात हायड्रोजन असते व आतील गाभ्यात केवळ हिलियम उरते. आतला गाभा पुन्हा कोसळू लागतो. बाहेरिल आवरणातील हायड्रोजन जळू लागते व ताऱ्यांचे बाहेरील आवरण फ़ुगू लागते. जसा जसा फ़ुगवटा वाढतो तसातसा हायड्रोजनचे तापमान कमी होऊ लागते. तारा लाल व मोठा दिसू लागतो.
आतिल गाभा आत कोसळत असतो व त्यामुळे त्याचे तापमान वाढत असते. तापमान हिलियमच्या अणूप्रक्रियेस साजेसे झाले की आतिल गाभा हिलियमपासून कार्बन तयार करू लागतो. ह्या अणूप्रक्रियेच्या ऊर्जेमुळे गाभ्याच्या आत कोसळणे तात्पुरते थांबते. बाहेरील आवरण आत निर्माण होणाय्रा ऊर्जेमुळे अजून फ़ुगू लागते. अशा ताऱ्यांला लाल राक्षसी तारा म्हणतात.

शेवटी हिलियमदेखिल संपते व गाभा पुन्हा कोसळू लागतो. बाहेरिल थर बाहेर फ़ेकले जातात व त्यांचे सुंदर प्लानेटरी नेब्युला तयार होतात. आतील तापमान पुन्हा वाढू लागते व कार्बनचे रूपांतर ऑक्सिजन, नियॉन, मॅग्नेशियम, सिलिकॉन व शेवटी लोहात होते. यात निर्माण होणाय्रा प्रचंड ऊर्जेने एक प्रचंड विस्फ़ोट घडतो. बाहेरील थर व गाभ्यात तयार झालेले अणू बाहेर फ़ेकले जातात.
ह्या स्फ़ोटामुळे ज्या लहरी निर्माण होतात त्या ताय्राच्या भोवताली असलेल्या हायड्रोजनच्या ढगांचे कोसळणे सुरू करण्यास कारणीभूत ठरतात. थोडक्यात यामुळे नविन तारे जन्माला येतात. ताऱ्यांच्या स्फ़ोटांमध्ये बाहेर फ़ेकले गेलेल्या अणूंपासूनच आपले शरिर बनले आहे. आपण वापरत असलेले लोखंड व इतर सर्व गोष्टी ह्या खूप वर्षांपूर्वी एका ताऱ्याच्या अणूभट्टीत तयार झाल्या आहेत.
लोहाच्या अणूप्रक्रियेत ऊर्जानिर्मीती न होता ऊर्जेचा व्यय होतो आणि त्यामुळे ताय्राचा गाभ्याची घनता पुन्हा वाढू लागते. शेवटी जर ताऱ्याचे वजन एका मर्यादेपेक्षा कमी असले तर इलेक्ट्रॉनच्या अनाकर्षणामुळे ताऱ्याच्या गाभ्याचे कोसळणे थांबते. अशा ताऱ्याला पांढरा खुजा तारा म्हणतात.
एका विशिष्ट मर्यादेपलिकडे वजन असल्यास न्यूट्रॉनचा दाब गाभ्याला कोसळण्यापासून थांबवतो. पण जे तारे आपल्या सूर्याच्या पाचपट वस्तूमान असलेले असतात, त्यांचा गाभ्याची घनता इतकी वाढते की प्रकाशदेखील त्यांच्या गुरूत्वाकर्षणातून सटकू शकत नाही आणि एक कृष्णविवर तयार होते.
छायाचित्र हक्कः नासा
2 comments:
Amazing photos--I think.
पाहताक्षणी चूक काढत असल्याबद्दल क्षमस्व. 'ताय्रांचे' असे लिहिताना नक्कीच तुम्हास ताऱ्यांचे असे म्हणायचे असेल. 'ऱ्य' याप्रकारचे जोडशब्द मराठी फॉन्ट्समध्ये थोडे विचित्ररित्या बनत असल्याचा हा परिणाम खरं तर. हे जोडाक्षर ऱ+्+य अशा प्रकारे लिहिले जाते. व्याकरणदृष्ट्या ऱ हे अक्षर मराठीत स्वतंत्र अस्तित्व बाळगल्याचे माझ्या माहितीत नाही. तरीही उच्चारानुसार तांत्रिकदृष्ट्या समान असलेल्या 'र्य' आणि 'ऱ्य' यांमध्ये फरक करण्यासाठी फॉन्ट अशा पद्धतीने विकसित केले जातात. जर तुम्ही इनस्क्रिप्ट पद्धत वापरत असाल तर 'ऱ' हे अक्षर 'J' या कळीवर आहे.
एक फॉन्ट विकसक आणि स्थानिकीकरण अभियंता या नात्याने ही माहिती पुरवणं मी माझं कर्तव्य समजत आहे. असो. तुमचा उपक्रम छान आहे आणि हे लेखदेखील. खगोलप्रेमी या नात्याने तुम्हास एक नियमित वाचक (आणि टिकाकार, जर तुमची हरकत नसल्यास)मिळाला आहे.
Post a Comment